विविधतेतून फुललेलं जीवन..
- Shreenit

- Jul 28, 2024
- 1 min read
प्रेमात पडलो जरी आम्ही, कधीच आम्हास लागत नाही
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..
किती साऱ्या विविधता नवतरुणींची..
कित्येक चांदण्या आकाशी
जाई.. जुई.. रातराणी.. केवडा.. उगाच दरवळ नाकाशी..
आमही चक्कर मारतो बागेत फक्त....
सुगंध कधी कधी मागत नाही
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..
सोडून जाता तुम्ही बालिका विरह वेदना ठणकत बसते..
कितीक पाहिल्या .. अनुभवल्या.. परि अंती सोबत कुनीच नसते
समजावतो प्रत्येक वेळी मी मनाला..
उगाच रात्री मी जागत नाही..
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..
Comments